Tuesday, 31 December 2013

Happy New Year!!!

वर्ष संपाया आले जुने 
जुनी रात्र अन सरते 
म्हणूनि मन हे म्हणते 
Happy New Year!!!

जुन्या आठवांचे दु:ख 
नव्या सुखाची चाहूल 
यांची आगळी सांगड 
Happy New Year!!!

दिस येणार नवे अन 
मन भरेल प्रेमाने 
अशा गोडशा स्वप्नांचे हे 
Happy New Year!!!

रहो आनंदी आनंद 
सर्वा सुखाचे दे दान 
हेचि मागणे देवास 
Happy New Year!!!

- Oms
३१-१२-२०१३
रा. ०९.००




Wednesday, 18 December 2013

कदाचित यालाच रडणं म्हणतात !!!

रडताना फक्त डोळ्यातले चार थेंब तेवढे दिसतात 
त्यातुन ओलावाणाऱ्या भावना मात्र कुठेतरी नकळत लपून जातात
हे कळूनही माणूस रडणं सोडत नाही 
डोळे पाणावून स्वतःच्याच मनाला सुखावणं सोडत नाही 
कदाचित यालाच रडणं म्हणतात !!!

रडू हे दारुच्या घोटासारखं असतं 
एकदा का प्यावा वाटला की प्यायाल्यावारच बरं वाटतं
आता पुरे …आता पुरे… मन सारखं म्हणत असतं 
पण थेंबांमध्ये या रंगून जाणं आपसूक होत असतं
कदाचित यालाच रडणं म्हणतात !!!

मनातलं वादळ हे रडू नकळत शांत करत असतं 
ओलावलेल्या मनाला ओलेपाणानेच सुकवत असतं 
काय गम्मत असते बघा की ओघळणारं पाणी तेच असतं 
हसणं, रडणं या मनाच्याच खेळात काय तो बदल असतो
आणि म्हणूनच की काय………………

कदाचित…………… यालाच……………. रडणं म्हणतात !!!

- Oms 
१९/१२/२०१३
१२.३० am

Friday, 13 December 2013

LOVE LETTER ...!!!

अरे प्यारमे  हुए पागल
पण वेळ मिळत नाही
meetings outings च्या जमान्यात
आपले भेटणेच होत नाही

workload असतं heavy
boss काही सोडत नाही
one liner sms शिवाय
आपण काहीच बोलत नाही

call केला तरी
असतो सदा phone busy
कबाब मे हड्डी है time
चाहे मियां बिवी हो राझी

कभी गलतीसे मिल भी गये
तर फक्त बडबड बिते कल की
और वो date भी बन जाती है
बिना romantic पल की

तेव्हा आठवण येते माझी
हातात paper आणि pen येतं
या networking च्या काळात सुध्दा
हे loveletter च कामी येतं…

- Oms
१३/१२/२०१३
११:५५ मि.

Saturday, 14 September 2013

|| श्रीगणेश नामावली ||

भालचंद्रा शूलपाणी विधात्या सर्वेश्वरा
महाकाय तू लाभेशा प्रबुद्धा सुखदेश्वरा ।।१।।

विघ्नकर्ता विघ्नहर्ता विघ्नेशा विघ्ननाशका
सुखेशा सर्वसौख्येशा सुखकर्ता सुखदायका।।२।।

सुरेशा तू सूरस्वामी सुरपुज्या सुरनायका
चिंतामणी तू आद्येशा गौरीसुता गुणनायका।।३।।

मोरेश्वरा गणनायका गजवक्त्रा गजानना
वक्रतुंडा हे सिद्धेशा एकदंता मुषकासना ।।४।।

धूम्रवर्णा हे मंदारा हेरंबा श्रीगणेश्वरा
कवीशा तू जगत्स्वामी अमिता लंबोदरा ।।५।।

प्रारंभा मोरया देवा वरदेशा विनायका
रक्तगंधानुलीप्तांगा कपिला महानायका ।।६।।

- Oms
१५/०९/२०१३
०१:१५ मि.

Friday, 13 September 2013

कधीतरी माझ्या मनी तू .............

कधीतरी माझ्या मनी तू , सांज होऊन ये
कधी हलकेच अंतरीची , तार छेडून ये ……।।धृ।।

मी असा वेडापिसा , होऊन वाट पाहतो
चाहूल तुझ्या असण्याची , मजसाठी घेऊन ये …. ।।१।।

शिशिरात पाने सारी , या गोड धुक्यातच न्हाली
दवबिंदू  हे प्रीतीचे , पहाटे पांघरून ये …. ।।२।।

आठवांना मी तुझ्या , स्वप्नात माझ्या गुंफतो
सुखाचा जणू एक मुग्ध , स्पर्श होऊन ये …. ।।३।।

सूर ना मज सापडे , अश्रूही बघ आटले
पोळणाऱ्या जीवनी तू , सावली होऊन ये …. ।।४।।

- Oms
१४/०९/२०१३
०१:५४ मि .

Sunday, 8 September 2013

नमस्कार............ !!!!!!! (श्लोक).......

गजानना बा रे स्वामी दयाळा
तुझ्या आगमने घर होई देव्हारा
तुझ्या दर्शने तृप्ती लाभे मनासी
नमस्कार माझा श्री विनायकासी ।।१।।

असावे सदा सुख आनंद सौख्य
नसावे कदा दैन्य दारिद्र्य दु:ख
देणे करावे अशा आशिषासी
नमस्कार माझा श्री विघ्नेश्वरासी ।।२।।

तू सुखकर्ता तू विघ्नांचा हर्ता
तू माय पिता तू पालनकर्ता
चुका माझिया उदरी घालून घेसी
नमस्कार माझा श्री लंबोदरासी ।।३।।

हे शूर्पकर्णा हे एकदंता
हे गजवक्त्रा हे शंकरसुता
सदा आम्हा भक्तांच्या पाठीशी राहसी
नमस्कार माझा श्री चिंतामणीसी ।।४।।

आता न फार मज बोलावीते
कर दोन्ही जोडूनी मन प्रार्थिते
सेवा सदा तुझी करवुनी घेसी
नमस्कार माझा श्री गणनायकासी ।।५।।

 - OMS
९/९/२०१३
०२:३८ मि .

Saturday, 31 August 2013

रडू......:( :( :) :) !!!!

कधीतरी नकळतच डोळ्यात पाणी येतं
नकळत आपले हात डोळ्यांचे
सांत्वन करू पाहतात

त्या बोटांना होणारा थेंबांचा स्पर्श 
बरच दुःख अबोल्यातही 
सांगून जातो 

तो कंठातच अडकलेला हुंदका
मनात अजून काहीतरी दडलंय हे
जाणवून देतो

ती ओली बोटे आपले ओले दुःख
आसपासच कुठेतरी सुकवण्यासाठी 
आपलेपणा शोधतात

पापण्या स्वतः मिटून जातात अन
अश्रूंना गालावरून पुन्हा मनाचीच 
वाट काढून देतात

मन पुन्हा आसवांच्या ओहोळान्तलं 
हलकं झालेलं दुःख अलगद 
झेलू पाहतं
जुन्या-नव्या साऱ्याच दुःखाच्या 
आठवणी पुन्हा पुन्हा काढून 
मन रडत राहतं ……!!!!!!!!!!!

- Oms
१/९/२०१३
१: ५४ मि.

 

Saturday, 24 August 2013

प्रेमात तू …. !!!!

तू …
जशी बरसत यावी श्रावण सर
आलीस तू
 तू
जशी उमलावी हलकेच वेल
फुललीस तू
का असतेस माझ्या मनी , माझ्या स्वप्नी
जरी दूर तरी माझ्या सामोरीच तू …


तू
मला कळले ना परी हवेहवेसे
शब्द तू
तू
कधी चुकलेला परी रुचलेला जणू
सूर तू
का सुचतेस कविता म्हणून माझ्या मनी
परी ना कळल्या भावांचा अर्थ तू …




तू
ना सरणाऱ्या अन उरणाऱ्या
वेळेत तू
तू
माझ्या चुकणाऱ्या परी पडणाऱ्या
ठोक्यात तू
का उरतेस श्वासात श्वास होऊनी
माझ्या अलगद उलगडणाऱ्या प्रेमात तू …. !!!!

- Oms
२५/८/२०१३
०२. ०७ मि .      

Tuesday, 23 July 2013

शब्दांसवे रात्रंदिनी ………!!!!


शब्दातल्या धुंदीत या , हरवतो रात्रंदिनी
मी मुक्या शब्दांसवे , संवादतो रात्रंदिनी ।।१।।

न कळे कसे माझे मला , हे कोडे कसे पडले
उत्तर त्याचे शोधतो , शब्दांसवे रात्रंदिनी ।।२।।

एकेकटे अक्षर ते , जुळते भावानंसावे
भावांस त्याही अर्थितो , शब्दांसवे रात्रंदिनी ।।३।।

स्वल्पसे आयुष्य त्याचे , उरते परी स्वारस्य हे
शब्दच होऊनी जगतो , शब्दांसवे रात्रंदिनी ।।४।।


By Oms
                                                                24/07/2013
01:20 AM

Friday, 26 April 2013

काही.......!!!!@@@!!!!.......

काही थेंब अश्रू म्हणूनच , नेहमी शोभून दिसतात
शिंपल्यातील मोत्यापरीस , गालावरच उठून दिसतात

काही शब्द मुकेपणीच , बरच सांगून जातात
मनातील भावना नकळत , दुसऱ्यापाशी घेऊन जातात

काही नाती न जुळताही , आपल्या सोबत असतात
नात्यांमधला ओलावा , आपुलकीने जपत असतात

काही गोष्टी नसूनही , असल्यासारख्यच भासतात
शोधून सापडत नाहीत , परी मनास त्या जाणवतात



काही स्पर्श , गंध , रंग , आपलेसे वाटतात
अनोळखीशी जाणीव घेऊन , मनापाशीच दाटतात

काही क्षण आयुष्याचे , गणित उलगडून जातात
सुखाच्या आठवणीन्परिस , मनावर कोरून राहतात……

- Oms
26-04-2013

Sunday, 21 April 2013

मोरी प्यासी बंद नजरिया रे …॥

राधा पागल मीरा पागल
गोकुल की हर बाला पागल
मोरे प्यारे घनश्याम तोहे
दिखत नाही मोरा जिया रे
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासे मोरे दो नैना रे …॥ धृ ॥

जनम मरण  के सागर मे
जीवन की बल्खाती नैया रे
देखू जहां जहां सफर मे
दुजा रंग ना पायो रे  
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासे मोरे दो नैना रे …॥ १ ॥

रुठे कोई जग मे तोहरे
देवकी जसोदा मैय्या रे
देखत भागे जाय त्वरित हो
हमसे काहे रुठा रे
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासे  मोरे दो नैना रे …॥ २ ॥



रात रात भर जागे नाचे
गोपियोन्के बीच कान्हा रे
काहे दोस्त की याद मे
हर पल बीते तोहरा रे
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासे  मोरे दो नैना रे …॥ ३ ॥

हसो हमेशा मुझे देख
हम देख न किसको पायो रे
नजर हमारी चुराकर
तुम खूब रंग दिखायो रे
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासे मोरे दो नैना रे …॥ ४ ॥


तोहरी मुरली कि धून पे
मोरा जिया डोले जायो रे
मोरे नजर के सामने हमेशा
मुरलीधर हसैय्यो रे
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासी बंद नजरिया रे…॥
मोरी प्यासी बंद नजरिया रे …॥ ५ ॥
 - Oms
22-4-2013

Monday, 15 April 2013

" पंढरीचा राणा " !!!

पंढरीचा राणा वाळवंटी ठायी  ॥ धृ ॥

चंद्रभागातीर संतांचे आगार
नामनादे रंगे " विठ्ठल रखुमाई " ॥ १ ॥

तिन्ही देव जैसे उभे विटेवरी
वास सदा ज्याचा संतांचिये उरी ॥ २ ॥

टाळ वीणा दंग मृदुंगाचे बोली 
गजर नामाचा एकची विठाई ॥ ३ ॥ 
  

सावळेसे रूप सावळीशी भक्ती
राहे सदा चित्ती पांडुरंग मूर्ती ॥ ४ ॥

मनी एक आस माऊलीची कास
पांडुरंग भास चराचरा ठायी ॥ ५ ॥

- Oms
16/04/2013




Sunday, 14 April 2013

न कळे मना !!!!!!

का …….छळतो मला हा गारवा
न कळे मना
मी …… रमतो पुन्हा या स्पंदना
न कळे मना …… का ….

हरवते रात्र ही कशी
ओल्या धुक्याच्या कुशी
नीज नच का येत मजला
न कळे मना …… का ….

सांजवेळी धुंद शा
सोनेरी जाहल्या दिशा
माझा परी मीच नच का
न कळे मना …… का ….

हळवे किनारे कसे
लाटांना लावती पिसे
मी का असा बेभान सा
न कळे मना …… का ….

स्वप्नातली तू परी
तूच माझ्या अंतरी
झुरातोच का दिनरात मी
न कळे मना …… का ….

माझे हे मन बावरे
का हे न तुजला कळे
प्रीतीतला इकरार ही
न कळे मना …… का …. !!!!!!

 - Oms
15/04/2013.



   
   


Friday, 12 April 2013

ओला मनाचा किनारा !!!!!

डोळ्यातील अश्रू 
मनातले भाव 
आठवणींचं 
आपलंच एक गाव 
मनातील पात्रे 
मनाचच एक नाव 
मनातल्याच गोष्टींचा 
मनालाच नाही ठाव 

मनातलं दु:ख 
मनातलीच खंत 
मनातली वादळे 
मनातच शांत 
ओठावरचे हसू 
चेहऱ्यावरची भ्रांत 
मनातील गोष्टींचा 
मनातच होई अंत 

मनाच्या कोपऱ्यात 
विचारांचा कवडसा 
मनाच्या भावनांना 
चेहऱ्याचा आरसा 
हृदयातल्या स्पंदनांचा
मन हाच सखा 
भावविश्व उलगडून 
हा मात्र मुका 

दु:ख सुख सारे 
मनाच्याच गावा 
भावनांचा मनाला 
कधी ना दुरावा 
मनातलाच देव अन
मनाचाच देव्हारा
ओलाव्याने आसवांच्या 
ओला मनाचा किनारा !!!!! 

- Oms 
12-04-2013



Tuesday, 9 April 2013

तू नसता सामोरी !!!!!!!

तू नसता सामोरी
मन आठवणी या चोरी
कशी धुंद पावसाळी
ही रात्रही भिजलेली

ऋतू पावसाळी हिरवा
मन चिंब तुझे ओले
तू नसता सामोरी
मी थेंब बरसलेले

कळी उमलली हळूच
तुझ्या नाजूक स्पर्शाने
जशी स्पंदनेही झुरती
तुझ्या चिंब आठवांने

थेंब विसावती पानी
पाऊस थांबलेला   
तुझ्या प्रेमाचा ओलावा
परी जाणवे मजला

अशा या चिंब रातीला
मनी आठवणी या ओल्या
तुझ्या नसण्याचा ओलावा
परी जाणवे मनाला…
तुझ्या नसण्याचा ओलावा
परी जाणवे मनाला…!!!!!!!   

- Oms
10-04-2013