कधीतरी माझ्या मनी तू , सांज होऊन ये
कधी हलकेच अंतरीची , तार छेडून ये ……।।धृ।।
मी असा वेडापिसा , होऊन वाट पाहतो
चाहूल तुझ्या असण्याची , मजसाठी घेऊन ये …. ।।१।।
शिशिरात पाने सारी , या गोड धुक्यातच न्हाली
दवबिंदू हे प्रीतीचे , पहाटे पांघरून ये …. ।।२।।
आठवांना मी तुझ्या , स्वप्नात माझ्या गुंफतो
सुखाचा जणू एक मुग्ध , स्पर्श होऊन ये …. ।।३।।
सूर ना मज सापडे , अश्रूही बघ आटले
पोळणाऱ्या जीवनी तू , सावली होऊन ये …. ।।४।।
- Oms
१४/०९/२०१३
०१:५४ मि .

No comments:
Post a Comment