काही थेंब अश्रू म्हणूनच , नेहमी शोभून दिसतातशिंपल्यातील मोत्यापरीस , गालावरच उठून दिसतात
काही शब्द मुकेपणीच , बरच सांगून जातात
मनातील भावना नकळत , दुसऱ्यापाशी घेऊन जातात
काही नाती न जुळताही , आपल्या सोबत असतात
नात्यांमधला ओलावा , आपुलकीने जपत असतात
काही गोष्टी नसूनही , असल्यासारख्यच भासतात
शोधून सापडत नाहीत , परी मनास त्या जाणवतात

काही स्पर्श , गंध , रंग , आपलेसे वाटतात
अनोळखीशी जाणीव घेऊन , मनापाशीच दाटतात
काही क्षण आयुष्याचे , गणित उलगडून जातात
सुखाच्या आठवणीन्परिस , मनावर कोरून राहतात……
- Oms
26-04-2013
No comments:
Post a Comment