Friday, 12 April 2013

ओला मनाचा किनारा !!!!!

डोळ्यातील अश्रू 
मनातले भाव 
आठवणींचं 
आपलंच एक गाव 
मनातील पात्रे 
मनाचच एक नाव 
मनातल्याच गोष्टींचा 
मनालाच नाही ठाव 

मनातलं दु:ख 
मनातलीच खंत 
मनातली वादळे 
मनातच शांत 
ओठावरचे हसू 
चेहऱ्यावरची भ्रांत 
मनातील गोष्टींचा 
मनातच होई अंत 

मनाच्या कोपऱ्यात 
विचारांचा कवडसा 
मनाच्या भावनांना 
चेहऱ्याचा आरसा 
हृदयातल्या स्पंदनांचा
मन हाच सखा 
भावविश्व उलगडून 
हा मात्र मुका 

दु:ख सुख सारे 
मनाच्याच गावा 
भावनांचा मनाला 
कधी ना दुरावा 
मनातलाच देव अन
मनाचाच देव्हारा
ओलाव्याने आसवांच्या 
ओला मनाचा किनारा !!!!! 

- Oms 
12-04-2013



No comments:

Post a Comment