शब्दातल्या धुंदीत या , हरवतो रात्रंदिनी मी मुक्या शब्दांसवे , संवादतो रात्रंदिनी ।।१।।
न कळे कसे माझे मला , हे कोडे कसे पडले
उत्तर त्याचे शोधतो , शब्दांसवे रात्रंदिनी ।।२।।
एकेकटे अक्षर ते , जुळते भावानंसावे
भावांस त्याही अर्थितो , शब्दांसवे रात्रंदिनी ।।३।।
स्वल्पसे आयुष्य त्याचे , उरते परी स्वारस्य हे
शब्दच होऊनी जगतो , शब्दांसवे रात्रंदिनी ।।४।।
By Oms
24/07/2013
01:20 AM
No comments:
Post a Comment