Wednesday, 18 December 2013

कदाचित यालाच रडणं म्हणतात !!!

रडताना फक्त डोळ्यातले चार थेंब तेवढे दिसतात 
त्यातुन ओलावाणाऱ्या भावना मात्र कुठेतरी नकळत लपून जातात
हे कळूनही माणूस रडणं सोडत नाही 
डोळे पाणावून स्वतःच्याच मनाला सुखावणं सोडत नाही 
कदाचित यालाच रडणं म्हणतात !!!

रडू हे दारुच्या घोटासारखं असतं 
एकदा का प्यावा वाटला की प्यायाल्यावारच बरं वाटतं
आता पुरे …आता पुरे… मन सारखं म्हणत असतं 
पण थेंबांमध्ये या रंगून जाणं आपसूक होत असतं
कदाचित यालाच रडणं म्हणतात !!!

मनातलं वादळ हे रडू नकळत शांत करत असतं 
ओलावलेल्या मनाला ओलेपाणानेच सुकवत असतं 
काय गम्मत असते बघा की ओघळणारं पाणी तेच असतं 
हसणं, रडणं या मनाच्याच खेळात काय तो बदल असतो
आणि म्हणूनच की काय………………

कदाचित…………… यालाच……………. रडणं म्हणतात !!!

- Oms 
१९/१२/२०१३
१२.३० am

No comments:

Post a Comment