Tuesday, 27 May 2014

कुठे ग तुझा श्वास...!!!

इथे कोणता प्रवास थांबून राहिला 
खेळ कोणी हा असा अर्ध्यात सोडीला 
उगाच शोधिले मी रकाने रकाने 
कुठे ग तुझा श्वास गुंतून राहिला… 

कुणाला पुसावे असा प्रश्न आहे 
फक्त मुकेसेच श्वास बाजूस आहे 
हवेचाच आता ठिकाणा हा नाही 
कुठे हा तिचाच जीव अडकून राहिला… 

मिळेनाच ती वाट हरवून गेली 
वळण वाकडे कुठे ठेऊन गेली 
इतक्यातच तिने हाती तुरीच दिलेली
पावलांचाही अंदाज अनामिक राहिला… 

जलाची कितीदाच मिनती मी केली
वाहणाऱ्या पानी व्यथा निरोपिली 
दगा दिला त्याने, तुला भेटलेच नाही 
सांगावा तसाच तो अपूर्ण राहिला… 

तुला शोधण्याचे केले यत्न खूप वार 
संपला प्रवास, खेळात झाली हार 
कप्पे दिलाचे अन आताही रिकामे 
स्पंदनांत तुझा फक्त आभास राहिला…

- Oms 
२८/०५/२०१४
०१:२५ मि.

No comments:

Post a Comment