Thursday, 15 May 2014

बदललेलं...!!!

कागदाचा आकार, त्याचा समास, त्याच्या ओळी 
काहीच बदलत नाही… 
लिहिल्या जाणाऱ्या दोन शब्दांमधलं 
अंतर तेवढं वाढलेलं असतं 

चित्रातले रंग, त्यांचे अर्थ, त्यांची गडदता 
सारंकाही अगदी तसंच… 
फक्त कुंचल्याचे फराटे, रेखाटलेल्या रेषा 
यांचं नातं हरवलेलं असतं

शिल्पातली ती व्यक्ती, तिचे शरीरभाव, स्तब्धता 
सगळं कसं अगदी रेखीव… 
पण त्याच्या डोळ्यातलं भावविश्व मात्र 
कुणीतरी पुन्हा कोरलेलं असतं 

तेच गाणं जुनं, शब्द तेच, गुणगुणंही जुनंच 
अन सम आजही चुकत नाही… 
हातावर समेची ताळी देताना तेवढं
विचारांना तालाचं भान नसतं 

मनातले विचार, त्याचं अस्तित्त्व, त्याचं बोचणं 
सगळंच कसं नीटास मांडलेलं… 
तरीही त्याच्यातलं प्रतिबिंब मात्र 
रोज थोडंसं बदललेलं असतं… नाही…!!!

 
- Oms 
१५/०५/२०१४
२३:२८ मि.

 

No comments:

Post a Comment