आठवांच्या संग्रहालायी, अकल्पितसे कल्पिताना
कुठे लवंडे पेला रिता, कुठे रीतासा रकाना
जरी लागते धूळ पायी, या वाटेवरी चालताना
कुठे कुणाचे भाव गवसती, "नांदी" तून ते ऐकताना…
कुठे मुकीशी शकुंतलाही, कुठे राज्ञी द्वारिकेचि
झळ अजूनही पोहोचते ही, त्या प्याल्याच्या सिंधूची
दु:ख तयांचे अजून चरचरे, अश्रू तयांचे वेचीताना

अज्ञातातील सूज्ञ द्रौपदी, वर्दी किचकाच्या मृत्यूची
फुले वेचिते सुमित्रा कुठे, त्या ढळणाऱ्या अश्रूंची
त्या जिण्याची खंत अताशा, बोचते पुन्हा पाहताना

कधी बंदर "कावेरी"चे, कुठे बंधने "राधे"ची
कुठे "अप्पां"चे मुक्त गलबत, विरे कुठे ही नाव "दिना"ची
किनाराही हा उरला परका, या लाटांना झेलताना

"सखाराम"च्या द्वारी नांदे, "लक्ष्मी"पाठून "चंपा"ही
जुन्या "सख्या"च्या गोडपणावर, भाळे नकळत "नयना"ही
भावना इथे लाज पांघरे, असा निवाडा करताना

"माधवी"स ना हर वळणावर, भेटे येथे "भरतमुनी"
प्रश्न स्व:ताचे उत्तरसुद्धा, शोधू पाहे ही नारी
आता जाणवे मन हे स्त्रीचे, "नांदी" ही अनुभवताना
कुठे कुणाचे भाव गवसती, "नांदी" तून ते ऐकताना…!!!
- Oms
१८/०५/२०१४
०१:३८ मि.

No comments:
Post a Comment