Wednesday, 21 May 2014

एक ग्लास…

एक ग्लास…
एक ग्लास असतो …
कधी भरला … कधी रिकामा
कधी सरळ … कधी थोडा कललेला
कधी कोरडा … तर कधी ओलसर
कधी सकारण … कधी उगाच
एक ग्लास…

एक ग्लास…
कधी स्टीलचा … कधी प्लास्टिकचा
कधी थर्माकोलचा … कधी काचेचा
कधी स्वच्छ , पारदर्शी
कधी स्वार्थी , फक्त स्वत:चा …
तर कधी असाच पुसटश्या अंदाजांचा …
एक ग्लास…

एक ग्लास…
असतो पाण्याचा … सरबताचा
कधी छोटासा पण कडक चहाचा
मैत्री घोटाघोटाने पाजणाऱ्या पेयाचा
कधी सहज मन विरघळवणाऱ्या घोटांचा …
तर कधी उगाच त्यावर रेंगाळणाऱ्या बोटांचा …
एक ग्लास…

एक ग्लास…
लहानपणी चुकून पडलेला
तर कधी लक्ष वेधावं म्हणून पाडलेला
कधी लवंडता लवंडता सावरलेला
कधी सावरतानाच सांडलेला
अन 
कधी जणू मुद्दामच… टेबलाच्या कोपऱ्याशी थांबलेला
एक ग्लास…

- Oms
२२/०५/२०१४
००:२५ मि.


 

No comments:

Post a Comment