Monday, 12 May 2014

पण माझ्या मनामधलं............

अक्षरातले शोधून अर्थ कविता कदाचित तिला समजली 
पण माझ्या मनामधलं प्रेम तिला काही कळलं नाही

वेणूमधल्या सुरासुरातील आर्तता ही तिला उमगली
पण माझ्या मनामधलं प्रेम तिला काही कळलं नाही

तिच्या हसण्यावारची माझी गोड मुकीशी खळीही टिपली 
पण माझ्या मनामधलं प्रेम तिला काही कळलं नाही

नकळत झाल्या स्पर्शामधली शाहाऱ्याची भाषा कळली 
पण माझ्या मनामधलं प्रेम तिला काही कळलं नाही

कुजबुजणाऱ्या लाटांवरची फेसाळती भावना गमली 
पण माझ्या मनामधलं प्रेम तिला काही कळलं नाही

कागदाच्या होडीवरली निरोपाची चिट्ठी कळली 
पण माझ्या मनामधलं प्रेम तिला काही कळलं नाही

कुणी रेखाटल्या चित्रामधलीही रंगसंगती तिला भावली 
पण माझ्या मनामधलं प्रेम तिला काही कळलं नाही

देवळातल्या टाळ-वीणेची बोलीही अन तिला समजली 
पण माझ्या मनामधलं प्रेम तिला काही कळलं नाही

नाही तिचा दोष इथे अन शाप मला कुणी दिधला नाही… 
… पण माझ्या मनामधलं प्रेम तिला काही कळलं नाही… !!!

- Oms 
१३-०५-२०१४
०१:१३ मि. 

No comments:

Post a Comment