पापणी ही मिटली होती
जागे परी ते मन तुझे
का नेत्रांवर अजून तुझ्या
त्या आठवथेंबांचे ओझे…
सरली का ग याद माझी
सरले का ते पावसाळे
अजून का ते ओले असती
निळसर डोळ्यांचे किनारे…
दवांशी जडले का नाते
का उरे फक्त ते नीर मुके
आपुले म्हणता अश्रूही
का झाले होते तेही परके…
कूस का ती पाझरते
आठवणीतले चंद्र तारे
का ते चांदणे अजून ओले
तुझ्या काजळात साठणारे…
नीज ओलीशार झाली
का ओलावले स्वप्न तुझे
पापणी ही मिटली होती
जागे परी ते मन तुझे…
- Oms
१३-०५-२०१४
००:०२ मि.
जागे परी ते मन तुझे
का नेत्रांवर अजून तुझ्या
त्या आठवथेंबांचे ओझे…
सरली का ग याद माझी
सरले का ते पावसाळे
अजून का ते ओले असती
निळसर डोळ्यांचे किनारे…
दवांशी जडले का नाते
का उरे फक्त ते नीर मुके
आपुले म्हणता अश्रूही
का झाले होते तेही परके…
कूस का ती पाझरते
आठवणीतले चंद्र तारे
का ते चांदणे अजून ओले
तुझ्या काजळात साठणारे…
नीज ओलीशार झाली
का ओलावले स्वप्न तुझे
पापणी ही मिटली होती
जागे परी ते मन तुझे…
- Oms
१३-०५-२०१४
००:०२ मि.
No comments:
Post a Comment