Sunday, 27 April 2014

कैफियत...!!!

आजवर मी मला कधी भेटलोच नाही … 
खूप आरसे शोधिले पण 
तू दाखवलेच नाही … 
 
मांडली ही कैफियत माझी तुझ्या दारापुढे 
पण सारेच ऐकून अंती
तू दार उघडलेच नाही… 

पहाटे पानावरी मी मांडिले हे शब्द माझे
दवांची नक्षी समजुनी 
तू ते वाचलेच नाही… 

मेघसावल्यांसवे मी कैक निरोप धाडीले
चाहूल वर्षेची म्हणुनी 
तू बाकी पाहिलेच नाही… 

अश्रूही शिंपल्यात मी ते खास लपवूनी ठेविले 
अस्तित्त्व मोती करुनी 
तू ते स्वीकारलेच नाही …

उरलोच ना माझाही मी परकाही ना परकेपणे
माझीच माझ्या मनाशी 
तू गाठ घातलीच नाही … 

जगणेच झाले सांगणे मरणे मुक्याने बोलणे 
एवढे सोसवूनही तू
मागणे ऐकलेच नाही …

- Oms
२८/०४/२०१४

००:४५ मि.

  

No comments:

Post a Comment