कुणाचं दिसणं सुंदर असतं
कुणाचं हसणं सुंदर असतं
कुणाचं लाजणं सुंदर असतं
कुणाचं असणं सुंदर असतं
कुठेसा नाद पैंजणी असतो
कुठेसा भास लोभस असतो
कुठेसा स्पर्श अनामिक असतो
कुठेसा गंध दरवळ असतो
कुठेशी सोन पालवी असते
कुठेशी फक्त सावली असते
कुठेशी धार बरसात असते
कुठेशी नदी रुणझुणत असते
कुठेसे मायाबंधन असते
कुठेसे प्रीतमिलन असते
कुठेसे प्रेम निरंतर असते
कुठेसे जगणे गहाण असते
- Oms
०३/०६/२०१४
००:१४ मि.
कुणाचं हसणं सुंदर असतं
कुणाचं लाजणं सुंदर असतं
कुणाचं असणं सुंदर असतंकुठेसा नाद पैंजणी असतो
कुठेसा भास लोभस असतो
कुठेसा स्पर्श अनामिक असतो
कुठेसा गंध दरवळ असतो
कुठेशी सोन पालवी असते
कुठेशी फक्त सावली असते
कुठेशी धार बरसात असते
कुठेशी नदी रुणझुणत असते
कुठेसे मायाबंधन असते
कुठेसे प्रीतमिलन असते
कुठेसे प्रेम निरंतर असते
कुठेसे जगणे गहाण असते
- Oms
०३/०६/२०१४
००:१४ मि.
No comments:
Post a Comment