तुझ्या आसवांनी मन माझे ओले
तुझ्या आठवांनी आज सूर लागले
तान छेडीली पुन्हा नव्याने मी
गीत हे तुझ्यातच चिंब नाहले
श्वास माझे परी माझे न उरले
त्यांना तुझ्याच या गंधाने नादावले
दुरावाच हा झरतोय थेंबातुनी
ओलावूनी मना त्यांनी पास आणले
मौन शब्दांना आपसूक आलेले
तुझ्या मनानी असे या मनास बांधले
- Oms
१४/०६/२०१४
०१:५४ मि.
No comments:
Post a Comment