जमली ही वारी ।। संतांची ।।
वाळूतले कण ।। वारकरी जन ।।
टाळ-वीणे साथ ।। नामाची ।।
अवघे त्रैलोक्य ।। जाहले माऊली ।।
आस ही उरली ।। चरणांची ।।
भक्तीचाच रंग ।। भक्तीच दंगली ।।
किमया ही अशी ।। पांडुरंगाची ।।
नभी धरितो तो ।। सावळेसे ढग ।।
देवास काळजी ही ।। भक्तांची ।।
गजर, अभंग ।। तुळशीचे पान ।।
मने तृप्तविती ।। वैष्णवांची ।।
लक्ष वारकरी ।। चालती, डोलती ।।
का ही तयां ओढी ।। पंढरीची ।।
सुख दु:ख पार ।। वाहुनिया जाती ।।
सोहळाच ऐसा ।। नाही कुठे जगी ।।
इच्छिते पुरती ।। यात सर्वांची ।।
धन्य ते जीवन ।। धन्य ते चरण ।।
सेवा ज्यांसी घडे ।। या वारीची ।।
- Oms
२१-०६-२०१४
०१:३३ मि.


No comments:
Post a Comment