तू वळून पाहताना , पाहिले होतेच मी
लाजलीस गाली हळूच, पाहता तुलाच मी….
माळला होतास तू , केसात गजरा जाईचा
त्या फुलांचा गंध माझ्या , दाटला श्वासातूनी….
ते तुझे हसणे शराबी , मी तयातच झिंगतो
ही नशा चढते मला , जागेपणी, स्वप्नातूनी….
त्या तुझ्या ओठांवरी , ही लालीही रेंगाळली
उरतो तसाच मी तयांच्या , बोलक्या कंपातूनी….
पापण्या मिटल्यास तू , परी पाहणे ना थांबले
पाहिले तेव्हाही तुजला , मी तुझ्या मनातूनी….
- Oms
३०/०७/२०१४
०१:४० मि.

No comments:
Post a Comment