Sunday, 27 July 2014

श्रावणातला पाऊस रुणझुण...!!!

श्रावणातला पाऊस रुणझुण
कधी सरी तर कधी सोन-ऊन्ह
हिरवाई ही झुलते न्हाऊन
चिंब आठवणी मनी साठवून

पालवीला गंध नवा
सवे रंगाचा नभी मेळावा
बावरलेले झाड, वेली अन
चिंब आठवणी मनी साठवून


सर ही झरते अपेक्षेविना 
भिजवून जाई रिता रकाना
ओलावती हे रस्ते, खिडक्या
चिंब आठवणी मनी साठवून

ओघळती जलधारा भू-वर
जशी प्रेयसी मिलना आतुर
प्रेमापरी हा पाऊस बहरे
चिंब आठवणी मनी साठवून 


थेंब बरसती हळूच नाजूक
जशी मनांची होई कुजबुज
झरून जातो मीच तयातून
चिंब आठवणी मनी साठवून

- Oms
२८-०७-२०१४
०१:५० मि.


No comments:

Post a Comment