एक रात्र… सामसूम रस्ता…
रस्त्यावर लागलेला तो एकच दिवा…
त्या दिव्याला टेकून उभा असलेला
तो… कुणीतरी …
हळूच अलगद पिस लहरत यावं
तशी आलेली ती… कुणीतरी…
अन त्या दोघांच्या मिठीतून
मला उलगडत जाणारं
ते … एक स्वप्न …

थोडासा काळोख…
पायाला जाणवणारा गारवा…
मिणमिणता पसरलेला चांदवा…
त्यात चांदावलेलं ते… शांत तळं…
त्या अलवार लहरींचा पावलांना होणारा
तो लोभस स्पर्श…
अन त्या स्पर्शातून
अबोलसं उमगत जाणारं
ते … एक स्वप्न …
एक खिडकी… तिची पावसाळी चौकट…
तिची ओली तावदानं…
तिच्या काठाशी ठेवलेला कॉफीचा मग…
त्या वाफांशी खेळणारी ती बोटं…
तर कुणाच्यातरी आठवणीत हळूच हसणारी… ती…
अन तिच्या त्या आठवणींत
मला नकळत रमवणारं
ते … एक स्वप्न …
एक घर… त्या भोवतालचं अंगण…
त्यात सांडलेला पारिजाताचा सडा…
त्या सड्यातून नाचणारी… ती पाऊले…
त्या पावलांमुळे होणारा पैंजणनाद…
त्या नादात दिसलेलं… ते रूप…
अन त्या सुंदर रूपानं
मनाला अखंड नादावणारं
ते … एक स्वप्न …!!!
- Oms
०५/०८/२०१४
१२:२६ मि.
रस्त्यावर लागलेला तो एकच दिवा…
त्या दिव्याला टेकून उभा असलेला
तो… कुणीतरी …
हळूच अलगद पिस लहरत यावं
तशी आलेली ती… कुणीतरी…
अन त्या दोघांच्या मिठीतून
मला उलगडत जाणारं
ते … एक स्वप्न …

थोडासा काळोख…
पायाला जाणवणारा गारवा…
मिणमिणता पसरलेला चांदवा…
त्यात चांदावलेलं ते… शांत तळं…
त्या अलवार लहरींचा पावलांना होणारा
तो लोभस स्पर्श…
अन त्या स्पर्शातून
अबोलसं उमगत जाणारं
ते … एक स्वप्न …
एक खिडकी… तिची पावसाळी चौकट…
तिची ओली तावदानं…
तिच्या काठाशी ठेवलेला कॉफीचा मग…
त्या वाफांशी खेळणारी ती बोटं…
तर कुणाच्यातरी आठवणीत हळूच हसणारी… ती…
अन तिच्या त्या आठवणींत
मला नकळत रमवणारं
ते … एक स्वप्न …
एक घर… त्या भोवतालचं अंगण…
त्यात सांडलेला पारिजाताचा सडा…
त्या सड्यातून नाचणारी… ती पाऊले…
त्या पावलांमुळे होणारा पैंजणनाद…
त्या नादात दिसलेलं… ते रूप…
अन त्या सुंदर रूपानं
मनाला अखंड नादावणारं
ते … एक स्वप्न …!!!
- Oms
०५/०८/२०१४
१२:२६ मि.



No comments:
Post a Comment