Friday, 26 April 2013

काही.......!!!!@@@!!!!.......

काही थेंब अश्रू म्हणूनच , नेहमी शोभून दिसतात
शिंपल्यातील मोत्यापरीस , गालावरच उठून दिसतात

काही शब्द मुकेपणीच , बरच सांगून जातात
मनातील भावना नकळत , दुसऱ्यापाशी घेऊन जातात

काही नाती न जुळताही , आपल्या सोबत असतात
नात्यांमधला ओलावा , आपुलकीने जपत असतात

काही गोष्टी नसूनही , असल्यासारख्यच भासतात
शोधून सापडत नाहीत , परी मनास त्या जाणवतात



काही स्पर्श , गंध , रंग , आपलेसे वाटतात
अनोळखीशी जाणीव घेऊन , मनापाशीच दाटतात

काही क्षण आयुष्याचे , गणित उलगडून जातात
सुखाच्या आठवणीन्परिस , मनावर कोरून राहतात……

- Oms
26-04-2013

Sunday, 21 April 2013

मोरी प्यासी बंद नजरिया रे …॥

राधा पागल मीरा पागल
गोकुल की हर बाला पागल
मोरे प्यारे घनश्याम तोहे
दिखत नाही मोरा जिया रे
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासे मोरे दो नैना रे …॥ धृ ॥

जनम मरण  के सागर मे
जीवन की बल्खाती नैया रे
देखू जहां जहां सफर मे
दुजा रंग ना पायो रे  
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासे मोरे दो नैना रे …॥ १ ॥

रुठे कोई जग मे तोहरे
देवकी जसोदा मैय्या रे
देखत भागे जाय त्वरित हो
हमसे काहे रुठा रे
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासे  मोरे दो नैना रे …॥ २ ॥



रात रात भर जागे नाचे
गोपियोन्के बीच कान्हा रे
काहे दोस्त की याद मे
हर पल बीते तोहरा रे
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासे  मोरे दो नैना रे …॥ ३ ॥

हसो हमेशा मुझे देख
हम देख न किसको पायो रे
नजर हमारी चुराकर
तुम खूब रंग दिखायो रे
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासे मोरे दो नैना रे …॥ ४ ॥


तोहरी मुरली कि धून पे
मोरा जिया डोले जायो रे
मोरे नजर के सामने हमेशा
मुरलीधर हसैय्यो रे
श्याम कन्हैया तोरी दर्शन को
प्यासी बंद नजरिया रे…॥
मोरी प्यासी बंद नजरिया रे …॥ ५ ॥
 - Oms
22-4-2013

Monday, 15 April 2013

" पंढरीचा राणा " !!!

पंढरीचा राणा वाळवंटी ठायी  ॥ धृ ॥

चंद्रभागातीर संतांचे आगार
नामनादे रंगे " विठ्ठल रखुमाई " ॥ १ ॥

तिन्ही देव जैसे उभे विटेवरी
वास सदा ज्याचा संतांचिये उरी ॥ २ ॥

टाळ वीणा दंग मृदुंगाचे बोली 
गजर नामाचा एकची विठाई ॥ ३ ॥ 
  

सावळेसे रूप सावळीशी भक्ती
राहे सदा चित्ती पांडुरंग मूर्ती ॥ ४ ॥

मनी एक आस माऊलीची कास
पांडुरंग भास चराचरा ठायी ॥ ५ ॥

- Oms
16/04/2013




Sunday, 14 April 2013

न कळे मना !!!!!!

का …….छळतो मला हा गारवा
न कळे मना
मी …… रमतो पुन्हा या स्पंदना
न कळे मना …… का ….

हरवते रात्र ही कशी
ओल्या धुक्याच्या कुशी
नीज नच का येत मजला
न कळे मना …… का ….

सांजवेळी धुंद शा
सोनेरी जाहल्या दिशा
माझा परी मीच नच का
न कळे मना …… का ….

हळवे किनारे कसे
लाटांना लावती पिसे
मी का असा बेभान सा
न कळे मना …… का ….

स्वप्नातली तू परी
तूच माझ्या अंतरी
झुरातोच का दिनरात मी
न कळे मना …… का ….

माझे हे मन बावरे
का हे न तुजला कळे
प्रीतीतला इकरार ही
न कळे मना …… का …. !!!!!!

 - Oms
15/04/2013.



   
   


Friday, 12 April 2013

ओला मनाचा किनारा !!!!!

डोळ्यातील अश्रू 
मनातले भाव 
आठवणींचं 
आपलंच एक गाव 
मनातील पात्रे 
मनाचच एक नाव 
मनातल्याच गोष्टींचा 
मनालाच नाही ठाव 

मनातलं दु:ख 
मनातलीच खंत 
मनातली वादळे 
मनातच शांत 
ओठावरचे हसू 
चेहऱ्यावरची भ्रांत 
मनातील गोष्टींचा 
मनातच होई अंत 

मनाच्या कोपऱ्यात 
विचारांचा कवडसा 
मनाच्या भावनांना 
चेहऱ्याचा आरसा 
हृदयातल्या स्पंदनांचा
मन हाच सखा 
भावविश्व उलगडून 
हा मात्र मुका 

दु:ख सुख सारे 
मनाच्याच गावा 
भावनांचा मनाला 
कधी ना दुरावा 
मनातलाच देव अन
मनाचाच देव्हारा
ओलाव्याने आसवांच्या 
ओला मनाचा किनारा !!!!! 

- Oms 
12-04-2013



Tuesday, 9 April 2013

तू नसता सामोरी !!!!!!!

तू नसता सामोरी
मन आठवणी या चोरी
कशी धुंद पावसाळी
ही रात्रही भिजलेली

ऋतू पावसाळी हिरवा
मन चिंब तुझे ओले
तू नसता सामोरी
मी थेंब बरसलेले

कळी उमलली हळूच
तुझ्या नाजूक स्पर्शाने
जशी स्पंदनेही झुरती
तुझ्या चिंब आठवांने

थेंब विसावती पानी
पाऊस थांबलेला   
तुझ्या प्रेमाचा ओलावा
परी जाणवे मजला

अशा या चिंब रातीला
मनी आठवणी या ओल्या
तुझ्या नसण्याचा ओलावा
परी जाणवे मनाला…
तुझ्या नसण्याचा ओलावा
परी जाणवे मनाला…!!!!!!!   

- Oms
10-04-2013