शांततेची भाषा आपण शिकावी असं वाटलं
किती सहज एकमेकांशी हा अबोल संवाद चालतो
काय अजब आहे नाही …
अनेक जुने - नवे , हलके - गंभीर सारे विषय
अगदी स्पष्टपणे बोलले जातात इतरांच्या नकळत
इथे ना कधी नजरेची गरज असते ना कानांची
ह्या शांततेच्या भाषेला असते गरज जुळलेल्या मनाची
जणू वाराच " म्हणणं " पोहोचवण्याचे काम करत असतो
आणि आपण फक्त मनातून मुके बोल मांडत असतो
किती सोपं होऊन जातं सारं , शांत शांत अन तरी बोलकेसे
मनातलं सारं कळतं त्या मनाला पण वातावरण असते तरी परकेसे
मशगुलश्या सांजवेळी कोणाशीतरी असंच अबोलकं बोलावं म्हटलं
आणि म्हणूनच …. आता…. ही ….
" शांततेची भाषा " आपण शिकावी असं वाटलं…. !!!!!
- Oms
०२/०२/२०१४
००:२५ मि.

No comments:
Post a Comment