सुखे नांदे पंढरी ही भीमा वाहे संथ
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।धृ।।
येथे नाही दुजा भाव नाही थोर सान कोणी
पाय लागताच येथे विसरतात दु:खे जुनी
भक्तीभावासाठी देई उद्धाराचा हात
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।१।।
चरणाशी पुंडलिक हृदयाशी ज्ञानाई ही
मनामाझी तुकोबा अन जनाईची ही माऊली
संतांच्या या नावा येई त्याचाच सुगंध
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।२।।
ताल मृदुंगाच्या बोली नाचे माझी विठामाई
मंत्र अमृतासारिखा हाचि "विट्ठल रखुमाई"
सदा तुझी भक्ती व्हावी मागणे हे आर्त
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।३।।
-Oms
१८/०१/२०१४
१२:५५ मि.
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।धृ।।
येथे नाही दुजा भाव नाही थोर सान कोणीपाय लागताच येथे विसरतात दु:खे जुनी
भक्तीभावासाठी देई उद्धाराचा हात
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।१।।
चरणाशी पुंडलिक हृदयाशी ज्ञानाई ही
मनामाझी तुकोबा अन जनाईची ही माऊली
संतांच्या या नावा येई त्याचाच सुगंध
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।२।।
ताल मृदुंगाच्या बोली नाचे माझी विठामाईमंत्र अमृतासारिखा हाचि "विट्ठल रखुमाई"
सदा तुझी भक्ती व्हावी मागणे हे आर्त
विटेवरी उभा आहे अनाथांचा नाथ ।।३।।
-Oms
१८/०१/२०१४
१२:५५ मि.
No comments:
Post a Comment