अजून का झुरतेस तू , रेंगाळल्या सांजेपरी
का मनासी बोचणी ही , तुझ्याही माझ्यापरी
वेळ हा उरलाच नाही , फक्त उरल्या आठवणी
कालची अपुरीशी गणिते , सोडवावी आता कुणी
उह्नाने अशी पाठ फिरवता , फुल कोमेजे जरी
उन्हा नाही खंत अंती , फुलासी शिक्षा परी
चांदण्या या भासती , कधी डागण्या रात्रीसही
आता कदाचित पाहशील , ते चांदणे परक्यापरी
मग तुझे मन उलगडेल , पाने काही कालची
आसपास त्या " नाही " च्या , भेट होईल माझ्याशी
- Oms
०९/०२/२०१४
०२:१० मि.
का मनासी बोचणी ही , तुझ्याही माझ्यापरी
वेळ हा उरलाच नाही , फक्त उरल्या आठवणी
कालची अपुरीशी गणिते , सोडवावी आता कुणी
उह्नाने अशी पाठ फिरवता , फुल कोमेजे जरी
उन्हा नाही खंत अंती , फुलासी शिक्षा परी
चांदण्या या भासती , कधी डागण्या रात्रीसही
आता कदाचित पाहशील , ते चांदणे परक्यापरी
मग तुझे मन उलगडेल , पाने काही कालची
आसपास त्या " नाही " च्या , भेट होईल माझ्याशी
- Oms
०९/०२/२०१४
०२:१० मि.