भाव....?????
नेहमी संगती आपुल्या कुणी असावे असा नियम नसतो
परंतु एकाच्या सोबतीचा नेहमीच आपल्याला भ्रम असतो..
त्या भ्रमातील मनाच्या प्रेमाचा एक गंध असतो
असण्याचा एकमेकांच्या जीवाला अनोखा बंध असतो..
बंधात त्या सुखाच्या इवलासा लवलेश असतो
दुःखावर मनाच्या सुखाचा मोहक कवडसा असतो..
कवडश्यात आसवांच्या डोळ्यांचा कोपरा असतो
त्या चिंब कोपर्यातील काजळाच्या काळ्यातील अंधार असतो..
अंधरात फक्त हुंकारांच्या शब्दांच आधार असतो
ऐकण्यासाठी आतुर कान अन मनी विचार बेभान असतो..
बेभानातील मुक्याच्या तोंडातला आवाज असतो
त्या आवाजातील भावनांचा मन हाच आधार असतो....????????
Oms .................
२५/७/२०११.
No comments:
Post a Comment