प्रेमात तुझिया गे हा जीव आसावला
मनात माझिया तुझ्या आठवणींचा हिंदोळा.
डोळे तुझे आठवताना विचार सारा थांबला
त्या काज्लामधील काला डाग बनून गेला.
आवाज पैन्जानांचा घुमतो अजून कानी
नसली समोर माझ्या तरी असतो जवळ तुझ्या मी.
स्वरात तुझ्या गळ्याच्या असतो आवाज गुलाबी
मुक्या माझ्या मनालाही मिळतो स्वर सुरागी.
आठव तुझ्या कानांचा त्यातील सुंदर झुम्क्यांचा
त्यावरी असणार्या तुझ्या सुंदरे काळ्या केसांचा.
त्या काळ्या दुलाईचा तुला होतो का ग त्रास
मला मात्र त्याचा आठवतो फक्त रम्य सुवास.
रात्रीत तुझिया त्या मुग्ध स्पर्शाने जागा होतो
स्वप्नी तुलाच पाहतो जागेपणीही स्मरतो.
तुझ्या गाली खळीचा रंगच गुलाबी असतो
कधी असतो एकटा तेव्हा त्यात फसतो.
कधी हसतो अन बघतो तर तुझा भास असतो
पण त्या भासातहि क्षणांच्या मन जन्म जन्म जगतो.
जेव्हा तनास तुझ्या पावसाचा स्पर्श होतो
तेव्हा मनात माझ्या मी त्याचा हेवा करतो.
तुझ्या अशा त्या सौंदर्यावर मी रोजच कविता करतो
पण आधीची वाटते फिकी म्हणून नवीन लिहाया बसतो.
Oms ............
No comments:
Post a Comment