कवी.......
कवी कवी म्हणून काय म्हणता
करून दाखवा एखादी कविता
जुळवून दाखवा भावनांचे यमक
मग कळेल शब्दातले गमक
आहो कवी म्हणजे काय
तुम्ही काय जाणणार
शब्दांच्या कुशीत मायेने
तुम्ही कसे लोळणार
म्हणतात 'जे न देखे रवी ते देखे कवी '
पण तुम्हाला काय त्याचं
जिथे त्या रवीलाच किंमत नाही
तेथे कौतुकच काय त्याचं
आहो कविता अशीच जन्म नाही घेत
त्यासाठी खूप जगावं लागतं
कवीचं जीवन नशिबी आलं तर
खूप खूप भोगावं लागतं
एवढा सोपं नसतं शब्दांचा खेळ खेळणं
त्या भावारुपाची मदिरा प्राशन करणं
त्याची धुंदी अनुभवणं
अन शेवटी त्यातच रमण
एक वेळ दारूची झिंग उतरते
आलेला माज मावळतो
पण हा कविरूपी चकोर मात्र
कवितेच्या एकेका शब्दासाठी आसुसतो
कवी या शब्दाची फोडच आहे
' कल्पना विलास '
म्हणूनच त्याच्या कवितेत असतो
रूप रंग भावनांचा वास
त्याला सगळे भाव कळतात
ते कागदावरही येतात
पण त्याच्या मनातले ते सारे
त्याच्या मनात गुदमरतात
कधी सुचते तर अशी कि
थांबता थांबत नाही हि कविता
पण कधी विचार केलाय या कविचा
किती होतो त्यात त्याचं गुंता
तोच सोडवता सोडवता
सारं आयुष्य सरून जातं
पण सरते शेवटी हातामध्ये
एक कोरा कागद अन रिकामे पेन राहत.........
Oms .....
21/7/2011 Thursday